इंडोनेशियात भीषणं भूकंप; 35 ठार, 600 जखमी

इंडोनेशियाला शुक्रवारी भूकंपाचे मोठे धक्के बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.2 इतकी होती. या भीषण भूकंपामध्ये एका मोठय़ा रुग्णालयाची इमारत कोसळली असून त्याखाली अनेक रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सुलावेसी बेटावरील रुग्णालयाची इमारत या भूकंपामध्ये कोसळली आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत 35 नागरिकांचा मृत्यू झाला असून सुमारे 600 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींतील 200 ज्यांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

सुलावेसी प्रांत हा दलदलीचा असल्याने तेथे भूकंपामुळे दरडी कोसळण्याचे प्रकार मोठय़ा संख्येने घडले आहेत. शिवाय भूकंपाच्या धक्क्याने 130 सक्रिय ज्वालामुखी पुन्हा जिवंत होण्याची भीती निर्माण झाली आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा पहिला मोठा धक्का जाणवला. 60 हून अधिक घरांची पडझड झाली आहे.

सात सेकंदांसाठी हा भूकंपाचा झटका जाणवला. या भूकंपानंतर सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. मात्र समुद्रकिनाऱयावर सतर्प राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. गुरुवारीही इंडोनेशियातील काही ठिकाणी भूकंपाचे मध्यम स्वरूपाचे झटके जाणवले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *