आमदार सुलभाताई खोडके यांच्या पाठपुराव्याने मालमत्ता धारकांना आणखीन एक दिलासा, कर सवलतीसाठी अभय योजना लागू

अमरावती १४ मार्च : – अमरावती मधील मालमत्ताधारकांना चारपटीने वाढीव नवीन मालमत्ता कर आकारणीतून दिलासा देण्यासाठी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून हा कर दीड पटींवर आणण्यात आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या पाठपुराव्याला यश आला आहे. यासंदर्भात मुंबई मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या दालनात १२ मार्च रोजी निर्णय घेऊन चार पटीने होणारी मालमत्ता कर आकारणी आता दीड पटींवर करण्यात आली आहे. अमरावती महानगर पालिका क्षेत्रातील मालमत्ताकर थकबाकीधारकांना नव्या कर सुधारणे नुसार कर भरण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी व सूट मिळावी यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली . ज्यामध्ये ३१ मार्च २०२४ पर्यंत मालमत्ता करातील सामान्य कराच्या १० टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात मनपा आयुक्तांनी पत्र काढून सर्व झोन स्तरावर निर्देशित केले आहे. दुसरीकडे अमरावती महापालिकेच्या वाढीव कर आकारणीतून शहरवासीयांना मोठा दिलासा देण्यासाठी पाठपुरावा करून चार पट हुन अधिक आलेला मालमत्ता कर दीड पटींवर आणल्या बद्दल आ.सौ., सुलभाताई खोडके यांचे सर्वत्र अभिनंदन व आभार मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *